शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत बबन राखुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे करमाळा,माढा,माळशिरस या तीन तालुक्याचे विभागाचे उपजिल्हाप्रमुख पद देण्यात आले.
करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख रवी आमले,जिल्हाप्रमुख महेश चिवटे,तालुका समन्वयक विलासराव घुमरे,महिला नेत्या पद्मजा इंगोले,महिला शहर प्रमुख कीर्ती स्वामी,शहर प्रमुख संजय शीलवंत यांच्या हस्ते पद नियुक्तीपत्र देण्यात आले.
करमाळा तालुक्यातील युवा सेना मजबूत करून प्रत्येक गाव तेथे युवा सेनेच्या शाखा सुरू करून संघटना मजबूत करणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिग्विजय दिगंबरराव बागल यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी सांगितले.यावेळी संपर्कप्रमुख रवी आमले म्हणाले की जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निष्ठा ठेवून प्रामाणिक काम करतील त्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम शिवसेना पक्ष करणार आहे.

